Ramdas Kadam uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: आनंद दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना 'ती' गोष्ट मला सांगितली होती; रामदास कदम यांचा गौप्यस्फोट

Ramdas Kadam targets uddhav Thackeray: आनंद दिघे यांच्यासोबत काय झालं हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात बरीच चर्चा सुरु झाली आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूला २३ वर्षे झाले असले, तरी यावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावर बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. आनंद दिघे यांच्यासोबत काय झालं हे सर्व जिल्ह्याला माहिती आहे, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात बरीच चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.उद्धव ठाकरे आनंद दिघे यांचं खच्चीकरण करत होते. ठाकरेंनी आनंद दिघेंना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना ही गोष्ट सांगितली होती, असा मोठा दावा रामदास कदम यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी मोठे होणार्‍यांचे पंख कापले. यात माझ्यासह दिघेंचा देखील समावेश होता. दिघेंचे उद्धव ठाकरे खच्चीकरण करत होते हे १०० टक्के खरं आहे. माझ्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये अशी भीती त्यांना असावी. त्यांनी अनेक नेत्यांचे पंख कापले आहेत. त्यामुळे दिघे यांचे पंख कापण्याचे काम त्यांनी केले की काय? याबाबत माझ्या मनात संशय आहे, असं रामदास कदम म्हणाले आहेत.

शंभूराज देसाई यांना देखील शंका

आनंद दिघे यांचे निधन झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात शंका होती. काही तासांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, काही तासांत अचानक त्यांचा मृत्यू झाला. आमचे विधिमंडळातील सहकारी संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केले आहे, ते पाहता दिघेंच्या मृत्यूबाबत शंका घ्यायला वाव आहे, असे मत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. दरम्यान, चुकीच्या लोकांमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले. दौलतनगर (ता. पाटण) येथे ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी उद्धव ठाकरे दबावाखाली असल्याचे वक्तव्य केले आहे, याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, "भास्करराव जाधव यांना तसा अनुभव आला असावा. महायुतीत असताना उद्धव ठाकरे यांचा दबाव सहकारी पक्षांवर होता. महायुती सोडून चुकीच्या लोकांची संगत धरल्याने उद्धव ठाकरे यांना आता कोणाच्यातरी दबावाखाली राहावे लागत आहे. याचा विचार आता त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी करावा," असे आवाहन देसाई यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT