Bolero  Esakal
महाराष्ट्र बातम्या

अखेर महिंद्रांनी दिले दत्तात्रयला गिफ्ट; Bolero पाहताच अश्रू अनावर

आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला.

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे (सांगली) : 'दिस जातील दिस येतील, भोग सरंल, सुख येईल' या गाण्याच्या ओळीप्रमाणे दत्तात्रय लोहार यांचा संसाराचा गाडा सुरु होता. त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी चक्क बोलेरो (Bolero)देतो असे ट्विट केले. आणि आज महिंद्रा कंपनीने  बोलेरो दत्तात्रय लोहार (Dattatraya Lohar) यांना सुपूर्त केली आहे. व दत्तात्रयने त्याची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले.

दत्तात्रय यांचा मिनी जिप्सी तयार करण्यासाठी खस्ता

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या  दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. विशेष बाब म्हणजे दत्तात्रय हा शाळाही  शिकलेला नाही. परंतु त्याच्या प्रबळ इच्छशक्तीमुळे तो मिनी जिप्सी तयार करू शकला. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशनचा त्याचा  व्यवसाय आहे. ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून  शिकला आहे.मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

आनंद महिंद्रा यांचे ट्विट

दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीचा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय यांनी बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅली मध्ये प्रदर्शनास ठेवणार असे ट्विट केले होते. यावर दत्तात्रय यांनी महिंद्रा यांची बोलेरोची ऑफर नाकारली अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु मी बोलरोची वाट पाहतोय अशी बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती.

कृषि राज्यमंत्र्यांचा जिप्सीतून फेरफटका

राज्यमंत्री कदम यांनी मतदार संघातील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमितील दत्तात्रय लोहार यांचे कौतुक केले. यासाठी कुटुंबातील सर्वानी कष्ट घेतले. दत्तात्रय लोहार यास लागेल ती मदत करण्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सत्तर हजार रु. धनादेशही त्यांना सुपूर्त केला. दत्तात्रयच्या मिनी जिप्सीतुन कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam)यांनी फेरफटका ही मारला तसेच आनंद महिंद्रा यांचे मानले आभार.

मिनिजिप्सी वर लोकगीतातून जागर

मिनी जिप्सी देशात चर्चेचा विषय झालेला असताना  दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी  मिनी जिप्सीवर गाणं रचले आहे. 'गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर, या गाडीला लोहार डायवर ,गाडी पॉम पॉम,कशी वाजते मोटार,या गाडीला वहिनी डायवर,या गाडीला दत्ता भाऊ डायवर,बाई कडेगाव तालुक्यात हाय देवराष्ट्रे गाव ,यशवंतराव चव्हाण बाई हे देवराष्ट्रे गाव,गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटर, हाताची हाय ही कला महाराष्ट्रात प्रसाद दिला. अशी रचना त्यांनी केली.

दैनिक सकाळचे विशेष आभार

मी तयार केलेल्या मिनी जिप्सीला सर्व माध्यमांनी प्रसिद्धी दिली मी सर्वांचा ऋणी आहे. मी बोलेरोची ऑफर नाकारली अशा काही अफवा झाल्या यावेळी दैनिक सकाळची टीम माझ्या पाठीशी राहिली. तसेच  मी बोलरोची वाट पाहतोय ही बातमी ईसकाळला प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिंद्रा कंपनीने घरी येऊन संपर्क साधला. आणि आज मला बोलेरो मिळाली. दैनिक सकाळचे विशेष आभार मानतो.

दत्तात्रय लोहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील 'बारापुल्ला फेज-३' कॉरिडॉरचे उद्घाटन

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT