anant karmuse beating case karmuse assault case allegation on ncp jitendra awhad decision news esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्वाचे निर्देश

सकाळ डिजिटल टीम

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे.

या मारहाण प्रकरणी दिलेल्या निकालात आज सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे.तसेच तिन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करावी असे निर्देष सुप्रीम कोर्टाने दिल्याचे करमुसे यांनी सांगितले. करमुसे हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

प्रकरण काय आहे?

अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT