Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: विभक्त पती वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंधारे स्पष्टच बोलल्या..

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्याच सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दरम्यान सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पुढील वाटचालीसाठी सुषमा अंधारे यांनी त्यांच्या विभक्त झालेल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. कोण कोणत्या गटात जात याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मी गेली 4 ते 5 वर्षे विभक्त राहते आहे. त्यामुळे व्यक्ति म्हणून त्यांना निर्णय घेण्याचं स्वतंत्र आहे. मी त्यांच्या कारकीर्दीलाही शुभेच्छा देईल या पलीकडे बोलण्यासारख माझ्याकडे काहीच नाही. ते याआधी कुठं होते हेही मला माहीत नाही. मला त्यांच्याबद्दल काही बोलवसही वाटतं नाही. सर्वांच वैयक्तिक आयुष्य असतं, सर्वांचा भूतकाळ असतो त्यामुळे मला यावर काहीच बोलव वाटतं नाही.

गेल्या 4 वर्षापासून आम्ही वेगळे राहत असल्यामुळे प्रतिक्रिया देणं योग्य नाही असंही अंधारे म्हणाल्यात. त्यांनी कुठेही गेल्याने काही फरक पडत नाही असंही त्या पुढे म्हणाल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zeeshan Siddique Death Threat : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकींना धमकी 'वडिलांच्या हत्येच्या वेळी नशिबाने वाचलास, आता...'

Koyna Water Project : कोयनेचे पाणी मुंबईला नेण्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च! वाशिष्ठीत वाया जाणारे पाणी मुंबईची भागवणार तहान? कोयनाच्या अवजलावर डोळा?

Marathi News Live Updates : निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्षात अंतर्गत लोकशाही आणण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षाने आपल्या राज्यघटनेत सुधारणा केली होती - सिब्बल

Commonwealth Games : २०३०मधील स्पर्धेचे बिगुल वाजले; राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT