Rutuja Latke
Rutuja Latke Sakal
महाराष्ट्र

Andheri By-Election: ट्वीस्ट वाढला! लटकेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; ठाकरे गट कोर्टात जाणार

दत्ता लवांडे

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्विकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे.

(Andheri By-Election Latest Updates)

"शिंदे फडणवीस सरकार हे महापालिका अधिकारी इक्बाल चहल यांच्यावर दबाव आणत आहे. त्यांना राजीनामा न स्विकारण्याबद्दल घाबरवतंय आणि नियमांची पायमल्ली करतंय. जिथे दादागिरीची भाषा आहे तिथे त्यांच्यावर कारवाई होत नाही. भर गर्दीत आमदार बंदुका चालवतो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि आम्ही संयमाने बोललो तरी आमच्यावर कारवाई होते" असं पेडणेकर म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी ऋतुजा लटके यांची बाळासाहेबांबरोबर बांधिलकी असल्याचंही सांगितलं आहे.

ऋतुजा लटकेंची उमेदवारी अडचणीत

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मान्य न झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. तर शिंदे गटाकडून लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर यासंदर्भात ठाकरे गट न्यायालयात धाव घेणार आहे.

ऋतुजा लटके मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या चर्चा

ऋतुजा लटके या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा आहे. त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. तर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर ठाकरे गटाकडूनही 'प्लॅन बी' तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या युतीकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती पण अंंधेरी पूर्वची जागा भाजप शिंदे गटाला सोडण्यात येणार असल्याच्याही चर्चा असल्यामुळे आता या निवडणुकीतील ट्वीस्ट वाढला आहे. तर ऋतुजा लटके या शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT