Rutuja Latke
Rutuja Latke Sakal
महाराष्ट्र

Shivsena: ऋतुजा लटकेसुद्धा जाणार होत्या शिंदे गटात; हळूहळू उघडतायेत पत्ते

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले असून यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. तर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न झाल्याचं वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

(Andheri By-Election Shivsena Rutuja Latke Latest Updates)

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अंतर्गत राजकारण आता समोर आलं आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिंदे गटात यायचं होतं पण त्या शिंदे गटात आल्या तरी भाजप नेते मुरजी पटेल हे या निवडणुकीत उतरणार हे ठरलेलं होतं. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवली असती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी शिंदे गटातील आपला प्रवेश थांबवला असल्याचं वृत्त आहे.

...म्हणून थांबला लटके यांचा शिंदे गटातील प्रवेश

मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व मतदारसंघात अनेक पैसे खर्च केल्यामुळे भाजपने त्यांना आधीच उमेदवारीचे आश्वासन दिले होते. तर आता शिंदे भाजप युती झाल्यानंतर भाजपचाच उमेदवार इथे उभा केला जाणार होता. तर लटके यांनी शिंदे गटात प्रवेश केला असता तर त्यांना उमेदवारी मिळणे कठीण होते. त्यामुळे त्याचा शिंदे गटातील प्रवेश थांबला. हे अंतर्गत राजकारण आता हळूहळू बाहेर येत आहे.

ऋतुजा लटकेंची उमेदवारी अजूनही अडचणीत

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने रमेश यांच्या पत्नी पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मान्य न झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. तर शिंदे गटाकडून लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT