Andheri Bypoll Ramesh Latke Father Kondiram Latke Reaction Rutuja Latke 
महाराष्ट्र बातम्या

Rutuja Latke: तिच्या पतीने जे काही केलं, ते ...; रमेश लटकेंच्या वडिलांना अश्रू अनावर

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, त्यांचे सासरे कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले. तिच्या पतीने जनतेसाठी जे काही केलं, ते तिनेही करावं” अशा भावना कोंदिराम लटके यांनी व्यक्त केल्या आहेत.(Andheri Bypoll Ramesh Latke Father Kondiram Latke Reaction Rutuja Latke)

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेने लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. ऋतुजा लटके आज अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांचे सासरे व दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

काय म्हणाले कोंदिराम लटके?

ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या नावासाठी उभ्या आहेत, पैशांसाठी नाही. त्यांना जनतेनं उभं केलं आहे. आता सर्वकाही जनतेच्या हातात आहे. ही प्रतिक्रिया देताना कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावनांना आवर घालत ऋतुजा लटके आपल्या पतीप्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे काम करून दाखवतील, असा विश्वासही सासरे कोंदिराम लटके यांनी व्यक्त केला.

तसेच, “ऋतुजा लटके ज्याच्या नावासाठी उभ्या आहेत. जनतेनंच त्यांना उभं केलं आहे. आता सगळं जनतेच्या हातात आहे. त्यामुळे पुढे काय करायचं, ते तुम्ही बघा. त्या रमेश लटके यांच्याप्रमाणेच एकदम डायरेक्ट काम करणार… त्याचा हिशोबच नाही. तिच्या पतीने जनतेसाठी जे काही केलं, ते तिनेही करावं. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयाकडून हे पत्र देण्यात आलं आहे. लटके या महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपीक) पदावर कार्यरत होत्या. लटके या २००६ पासून महानगरपालिकेच्या सेवेत होत्या. परंतु पती रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांना अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT