Anganwadi 
महाराष्ट्र बातम्या

अंगणवाडी सेविकांचे वाढणार मानधन?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधनवाढ द्यावी, सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद, कामावरील वेळेची मर्यादा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन निवासस्थानी भेट घेतली, त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण तत्पर असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले.

बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. मानधन हे कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाहीत. त्यामुळे वृद्धापकाळात औषधोपचाराचा खर्च, तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT