Anganwadi sakal
महाराष्ट्र बातम्या

अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका! वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन, प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे; झेडपी शाळांची पटसंख्या वाढणार

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग २०२५-२६ पासून करणार आहे. अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग २०२५-२६ पासून करणार आहे. अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल, यादृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राज्यात एकात्मिक बालविकासच्या ५५३ प्रकल्पांतर्गत एक लाख १० हजार ५५६ अंगणवाड्या आहेत. त्याअंतर्गत सव्वा लाखांपर्यंत सेविका कार्यरत आहेत. त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे. बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षांपर्यंत भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकास होईल, असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आले आहे. तीन ते सहा वर्षांपर्यंत अंगणवाड्यांमधील विद्यार्थी अक्षर, आकार, अंक ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे शिकतील, यादृष्टीने सेविका अध्यापन करतील.

‘मनोरंजनातून शिक्षण’ यावर अधिक भर राहणार असून, चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे. त्यादृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल, असा त्यामागील हेतू आहे.

चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे?

अंगणवाड्यांमध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत, त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे, याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाइन अभ्यास करावा लागणार आहे. दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. तो अभ्यास कसा करायचा, त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत, यावर ‘डायट’कडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. त्या अभ्यासावर सर्व सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

आतापर्यंत झाल्या दोन कार्यशाळा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अंगणवाड्यांमधील छोटा व मोठ्या गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तो चिमुकल्यांना शिकवायचा कसा, यावर अंगणवाडी सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. त्यासंदर्भात ‘डायट’कडून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून, आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या आहेत.

- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT