Darshana Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Darshana Pawar Murder Case: 'माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या', दर्शना पवारच्या आईने फोडला टाहो

दर्शना पवारच्या आई आणि भावाची संतप्त प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

राहुल हंडोरेला अटक झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आरोपी राहुल हांडोरेला आधी आमच्या ताब्यात द्या. नाही तर त्याला मारून टाका', असा टाहोच तिच्या कुटुंबीयांनी फोडला आहे.(Latest Marathi News)

दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर दर्शनाच्या भावाने संतप्त मागणी केलीय. 'त्याने माझ्या बहिणीचा घात केला आहे. त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. अन्यथा मारून टाका', अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शना पवारच्या भावाने दिली आहे.(Latest Marathi News)

'माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देवू शकते. माझी मुलगी गेलीय. तशा इतरांच्या मुली ‌जावू नये. आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या', अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.(Latest Marathi News)

राहुलची दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला होता.(Latest Marathi News)

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.(Latest Marathi News)

राहुल हांडोरे नेमका कुठं होता?

वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता.(Latest Marathi News)

पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT