Anil Deshmukh Devendra fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh:'समित कदम फडणवीसांचा जवळचा माणूस, त्याला Y दर्जाची सुरक्षा'; फोटो दाखवत अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

Anil Deshmukh allegation on deputy cm Devendra fadnavis: देखमुखांनी समित कदम यांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो त्यांनी माध्यमांना दाखवले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देखमुखांनी समित कदम यांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो त्यांनी माध्यमांना दाखवले आहेत.

अनिल देशमुख म्हणालेत की, 'समित कदम हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळेच समित कदम यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात देण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर समित कदम हे काय म्हणाले हे कळेलच.'

माझ्यावर खोटे आरोप ठेवण्यात आले होते. ईडीच्या चौकशीत अडकवण्याची धमकी मला देण्यात आली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. मला प्रतिज्ञापदावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. पाच ते सहा वेळा समित कदम माझ्याकडे आले होते. पण, मी असले खोटं काम करण्यास नकार दिला, असं अनिल देखमुख म्हणाले.

समित कदम हा माझ्याकडे लिफाफा घेऊन आला होता. तो मला पाच ते सहावेळा भेटला. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप चांगले संबंध आहेत. राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तीन वर्षापूर्वी अजित पवार यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आलं होतं. माझ्याकडे यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप आहेत, असं देखील ते म्हणाले.

समित कदम हा मिरजचा आहे. देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे अनेक फोटो तुम्हाला दिसतील. समित कदम यांच्या पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधत असल्याचे फोटो देखील आहेत. समित कदम हा साधा नगरसेवक देखील नाही. तरी त्याला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आलीये. मिरजमध्ये कोणीही सांगेल फडणवीस आणि समित कदम यांच्यामध्ये काय संबंध आहेत, असा खुलासा देखील देशमुखांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT