Anil Deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: अनिल देशमुखांची होणार अँजिओग्राफी; जसलोक रुग्णालयात दाखल

देशमुख वर्षभर आर्थर रोड तुरुंगात होते.

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांनी खाजगी रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती.

न्यायालयाने देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास परवानगी दिलेली आहे. अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांची खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांना आज जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ईडीने केलेल्या कारवाईत अनिल देशमुख यांन ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जामीन मंजूर करण्यात आला. परंतु सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अद्याप जामीन नाही. सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर करावा, यासाठी अनिल देशमुख प्रयत्न करत आहेत. शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. यातच त्यांचं गृहमंत्रीपद गेलं होतं. ईडीने या प्रकरणात ईसीआयआर दाखल केला होता. या प्रकरणात वर्षभर ते आर्थर रोड तुरुंगात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT