Anil Deshmukh sakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh : नेत्यांसह मुलांना अडकविण्याचे राजकारण;अनिल देशमुख यांचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावर खोटे आरोप करून या लहान मुलांना अडकविण्याचे घाणेरडे राजकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावर खोटे आरोप करून या लहान मुलांना अडकविण्याचे घाणेरडे राजकारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

ठाकरे, पवार यांना अडकविण्यासाठी समित कदम यांनी फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझी पाच-सहा वेळा भेट घेतली असल्याचा दावाही देशमुख यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांना लक्ष्य केल्यानंतर देशमुख यांनी आज पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला.

ते म्णाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून कदम यांनी तीन वर्षांपूर्वी माझी भेट घेतली होती. या वेळी त्यांनी चार खोटी प्रतिज्ञापत्रे तयार करण्यास सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर खोटे आरोप करण्यास व त्याची प्रतिज्ञापत्रे तयार करण्यास मला सांगण्यात आले. मी असे केले असते तर तेव्हाच महाविकास आघाडी सरकार पडले असते. तसेच आदित्य ठाकरे, पार्थ पवार मोठ्या अडचणीत सापडले असते,’’ असेही देशमुख यांनी सांगितले.

ते म्हणाले, की राज्याचा गृहमंत्री असताना मला समित कदम भेटण्यास आले होते. फडणवीस यांनी भेटण्यासाठी पाठवले असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती. या चर्चेवेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. खोटे आरोप करून एक तर तुरुंगामध्ये टाकायचे अन्यथा भाजपत घ्यायचे, हेच भाजपचे घाणेरडे राजकारण आहे.

कार्यकर्त्याला ‘वाय’ सुरक्षा

देशमुख म्हणालेे, की समित कदम हा मिरज येथील किरकोळ कार्यकर्ता आहे. ना कधी नगरसेवक, ना महापौर, ना उपमहापौर. तरीही फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याने त्याला ‘वाय’ सुरक्षा दिली. फडणवीस यांना कदम यांच्या पत्नीने राखी बांधल्याचे फोटो दाखवत त्यांच्या मैत्रीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला.

‘वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करा’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबत राज्याचे गृहमंत्री म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत दाखवून वस्तुस्थिती मांडावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

पटोले म्हणाले, की आपल्याकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्स आहेत, असा फडणवीस यांचा दावा आहे. हिंमत असेल तर त्यांनी वस्तुस्थिती मांडावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT