Anil Deshmukh in troubles again Charge sheet filed against daughter daughter in law Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल!

यापूर्वी अनिल देशमुख यांना क्लीनचीट मिळाल्याचा अहवाल लीक झाला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कारण परमबीर सिंह प्रकरणात त्यांना क्लीनचीट दिल्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांची सून आणि मुलीविरोधात सीबीआयनं खटला दाखल केला असून यातील आरोपपत्रात या दोघींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Anil Deshmukh in troubles again Charge sheet filed against daughter daughter in law)

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर सीबीआयनं अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. पण या प्रकरणात त्यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचा सीबीआयचा अंतर्गत अहवाल ऑगस्ट 2021 मध्ये मीडियामध्ये लीक झाला होता. या अहवाल लीक प्रकरणात देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्या नावाचा पुरवणी आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सीबीआयचा आरोप काय?

अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयनं अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे सबइन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. यात सोमवारी सीबीआयनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.

त्यात अनिल देशमुख यांनी मुलगी पूजा आणि सून राहत ऋषी देशमुख यांनी अभिषेक तिवारी या व्यक्तीकडून अहवाल मिळवत त्याचे व्हिडीओ काढूला नंतर त्यांनी तो सोशल मीडियावर टाकण्यात आला होता, असा आरोपात उल्लेख आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्या इतर दोन नातेवाईकांचाही यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT