Anil Deshmukh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: "माझ्या 6 वर्षांच्या नातीची अर्धा तास चौकशी केली"; अनिल देशमुखांचा ईडीवर गंभीर आरोप

जळगामध्ये राष्ट्रवादीच्या सभेत देशमुखांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : ईडीनं आपल्यावर हरप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला हे सांगताना माझ्या ६ वर्षांच्या नातीची देखील ईडीनं चॉकलेट दाखवून चौकशी केली, असा गांभीर आरोप माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. जळगावात आज शरद पवारांची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. (Anil Deshmukh Interrogated my 6 year old granddaughter for half an hour Anil Deshmukh allegations against ED)

देशमुख म्हणाले, स्वत:च्या ताकदीवर आपण आमदार, खासदार निवडून आणू शकत नाही, हे लक्षात आल्यावर एक वर्षापूर्वी राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. यामुळं शिवसेनेत फूट पाडली, ५० खोके देऊन आमदार फोडले गेले. मात्र, तरीही तोटाच झाल्याचं लक्षात येताच भाजपनं दुसरा प्रयोग केला. आपले राष्ट्रवादीचे आमदार भाजपासोबत गेले, काय कारण आहे? ईडीच्या धाकानं सगळे गेले. (Latest Marathi News)

मलाही ईडीचा धाक दाखवला गेला, हमारे साथ आओ अशी गळ मला घातली गेली. त्यानंतर माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला. मात्र, आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कोर्टात लेखी लिहून दिलं की हे आरोप ऐकीव होते, याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. अशा प्रकारे कोणत्याही आरोपात तथ्य नसताना मला १४ महिने तुरुंगात ठेवलं गेलं. माझ्या ६ वर्षांच्या नातीला चॅाकलेट दाखवून ईडीनं अर्धा तास चौकशी केली. एवढं होऊनही मी शरद पवारांसोबत सोबत राहिलो. (Latest Marathi News)

दरम्यान, प्रफुल्ल पटेल काल नागपूरमध्ये बोलले आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो. पण खरंतर ते देखील ईडी आणि सीबीआयच्या धाकानं तिकडे गेले आहेत, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी भाजप तसेच ईडीवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT