Court Judgement on Anil Deshmukh Bail News, Anil Deshmukh News e sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे; कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. आर्थर रोड तुरुंगातून आता सीबीआयने ताबा घेतला आहे. 100 कोटी वसुलीच्या प्रकरणी त्यांना अटक झाली होती. सीबीआय कोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुखांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.अनिलदेशमुखांची मागणी फेटाळल्यानंतर सीबीआयने देशमुखांचा ताबा आर्थररोडमधून घेतला. सीबीआयच्या कस्टडीला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं. (Court Judgement on Anil Deshmukh Bail)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. यावर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत तपासाची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने सीबीआयला आदेश दिले होते की, यामध्ये तथ्य असेल तर एफआयआर दाखल करा आणि तपास करा. त्यानुसार सीबीआयने एफआयआर दाखल करुन तपास सुरु केला. याआधी अनिल देशमुखांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कस्टडीमध्ये होते. त्यावेळी सीबीआयने सत्र न्यायालयात धाव घेत त्यांच्या चौकशीसाठी कस्टडीची मागणी केली होती. त्याविरोधात अनिल देशमुख या मागणीविरोधात हायकोर्टात गेले होते. त्या याचिकेवर सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. यानंतर आता सीबीआयने अनिल देशमुखांचा ताबा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

Kharpudi Bridge Flood : तीन दिवसांपासून पुलावरून पाणी; खरपूडी बुद्रुक-खुर्दचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना १२ किमीचा वळसा

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

SCROLL FOR NEXT