Anil Deshmukh e sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? वाझेच्या उत्तराने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) सध्या कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचे आरोप (Anil Deshmukh Money Laundering Case) केले होते. याचप्रकरणी चांदिवाल आयोगाच्या समोर देशमुखांच्या वकिलांकडून सचिन वाझेची उलटतपासणी सुरू आहे. यावेळी देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? असा प्रश्न वाझेला विचारला असता त्याने दिलेल्या उत्तराने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या मदतीने खंडणीचं रॅकेट चालवत असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी बडतर्फ केलेल्या सचिन वाझेला एनआयएने अटक केली होती. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली होती. विशेष न्यायालयाने देशमुखांच्या वकिलांना तसेच देशमुखांना चांदिवाल आयोगासमोर हजर राहण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर देशमुखांच्या वकिलांनी यापूर्वी देखील वाझेंची उलटतपासणी केली होती. आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली.

या उत्तराने खळबळ -

अनिल देशमुख यांच्याकडून किंवा शासकीय अधिकाऱ्याकडून कोणती मागणी करण्यात आली होती का? असा प्रश्न वाझेला विचारला असता त्याने 'नाही' असे उत्तर दिले. त्यानंतर देशमुखांकडून किंवा त्यांच्या संबंधित अधिकृत व्यक्तीकडून पैशांची मागणी केली होती का? असं विचारलं असता वाझेनी 'नाही' असे उत्तर दिले. या उत्तरामुळे खळबळ उडाली आहे.

देशमुखांच्या वकिलांनी विचारलेले प्रश्न -

प्रश्न : अनिल देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून बारमालकांकडून पैसे उकळण्यास करण्यास सांगितले होते का?

उत्तर : मला आठवत नाही

प्रश्न : तुम्ही बार मालकांकडून पैसे उकळलेत का?

उत्तर : नाही

पुढील सुनावनी २१ डिसेंबर रोजी

चांदिवाली आयोगाने वाझे आणि देशमुखांना भेटण्यासाठी वकिलांना परवानगी दिली आहे. देशमुख यांना वकिलांना भेटण्यासाठी १६ डिसेंबर ही तारीख दिली आहे, तर वाझेंना भेटण्यासाठी २० डिसेंबर तारीख दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ डिसेंबरला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT