Anil Deshmukh devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: 'ही तर देवेंद्र फडणवीसांची चाल'; सचिन वाझेंच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

Anil Deshmukh reaction after Sachin Vaze allegations: अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे यांचे आरोप हे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल असल्याचं ते म्हणाले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि खरी परिस्थिती समोर आणली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल आहे. त्यांना माहिती नाहीये की, मुंबई हायकोर्टाने स्पष्ट सांगितलंय सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो आता देखील गुन्ह्यासाठी तुरुंगात आहे. तो विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती नाही असं हायकोर्टानेच म्हटलं आहे, असं देशमुख म्हणाले.

सचिन वाझे सारख्या व्यक्तीला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत. वाझे याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय. पण, मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्याने आता त्यांनी सचिन वाझेला समोर केले आहे. त्यांनी नवा खेळ सुरु केला आहे. पण, लोकांना खरी परिस्थिती माहिती आहे, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

सचिन वाझेंनी काय केलेत आरोप?

सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. माझ्याकडील पुरावे मी सीबीआयला दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे. यात जयंत पाटील यांचे देखील नाव आहे. माझी नार्को टेस्ट करायची देखील तयारी आहे. मी जे बोलतोय ते खरं आहे, असं सचिन वाझे म्हणाले होते. एएनआयने त्यांची प्रतिक्रिया घेतली होती. यामुळे राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Tiger Spotted in Chandgad : चंदगडमध्ये थरार! तेऊरवाडी-हडलगे मार्गावर रात्रीच्या वेळी चालत्या गाडीसमोर आला वाघ; नागरिकांमध्ये मोठी दहशत

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

SCROLL FOR NEXT