anil deshmukh  esakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना SC चा मोठा दिलासा

सकाळ डिजिटल टीम

Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेले जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येथे देशमुखांना जामीन मिळाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी फेटाळून लावली आहे.

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुख तुरुंगात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT