anil deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांना जामीन की पुन्हा कोठडी? कोर्टात होणार हजर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठोठावण्यात आलेली ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे... आणि कोर्टात पुन्हा ईडीकडून देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर आता त्यांना बेल मिळणार की पुन्हा एकदा ईडी कोठडी ते पाहवं लागेल.

ED कडून पाचवेळा अनिल देशमुखांना ईडीचं समन्स पाठवले. वैद्यकीय कारणं, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं अनिल देशमुखांकडून सांगण्यात आली. पण अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर प्रदीर्घ चौकशीनंतरही समाधान झालं नाही म्हणून ईडीनं देशमुखांना अटक केली आहे.

देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख काल ईडी चौकशीला हजर राहिले नव्हते. कायदेशीर मार्गांची चापणी केल्यानंतरच ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती देशमुख कुटुंबियांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली होती. तर यासाठी हृषिकेश देशमुख यांनी ईडीकडे 15 दिवसांची मुदत देखील मागितल्याच्या माहितीही त्यांनी दिली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ठोठावण्यात आलेली ईडी (ED) कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. आणि कोर्टात पुन्हा ईडीकडून देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

अनिल देशमुखांना अटक झाली ते कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात. पण हे आरोप करणारे परमबीर सिंह अद्यापही गायबच आहेत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आणि हाच मुद्दा महाविकास आघाडीनं पकडून भाजपवर आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT