Anil Deshmukh  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Supreme Court : अनिल देशमुखांना काहीसा दिलासा; तातडीने सुनावणी घेण्याचे SC चे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने दिलेले हे निर्देश एक प्रकारे दिलासा असल्याचे मानले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी तातडीनं पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाला दिले आहेत. याशिवाय याच आठवड्यात सुनावणी घेण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले हे निर्देश एक प्रकारे दिलासा असल्याचे मानले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाला निर्देश दिलेले होते. त्यानुसार हायकोर्टाने सुनावणी घेण्यासह सुरुवात केली होती. मात्र, काही कारणास्तव ही सुनावणी एका खंडपीठाकाडून दुसऱ्या खंडापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. सुरुवातील एका न्यायमूर्तींनी याबाबतची सुनावणी ऐकली होती. यामध्ये केवळ तपास यंत्रणेचा युक्तिवाद बाकी होता. त्याचवेळी हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. मात्र, जे न्यायमूर्तींकडे हे प्रकरण गेले होते. त्यांनी काही वैयक्तिक कारणास्तव यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

या सर्वामध्ये या प्रकणावरील सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे देशमुखांकडून यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. तसेच सर्व परिस्थितीबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाबींची दखल घेत याच आठवड्यात या प्रकरणावरील सुनावणी घेत निकाल लवकरात लवकर लावण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह तसेच पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितले असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली आणि अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. सध्या देशमुख अर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : रांची येथे JPSC-JSSC उमेदवारांचे आंदोलन

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT