Amruta Fadnavis Blackmail Case 
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis Blackmail Case: अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणात नवा ट्विस्ट; आणखी एकाला अटक

अनिल सोबतच असलेल्या निर्मलला देखील गुजरात वरूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणात अनिल जयसिंघानी याच्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. काल बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. (Anil Jaisinghani close associate Nirmal Jaisinghani arrested Amruta Fadnavis Blackmail Case )

दरम्यान, अनिल जयसिंघानीच्या जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. अनिल सोबतच असलेल्या निर्मलला देखील गुजरात वरूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

अनिलला लपण्यात आणि लॉजिस्टिक सपोर्ट केल्याचा आरोप निर्मल याच्यावर आहे. हॉटेल बुकिंग निर्मल स्वतःच्या नावावर करायचा. अनिल जयसिंघानी आणि निर्मल या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या सात वर्षापासून जयसिंघानी फरार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. अमृता फडणवीस यांच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिस शोध घेत होते. अखेल गुजरातमधून त्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT