politics esakal
महाराष्ट्र बातम्या

नंबर एक कोण? चंद्रकांत पाटलांना परबांचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडीचा हा विजय असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींचा आज निकाल जाहीर झाले आहे. ही निवडणूक जरी स्थानिक पातळीवरील असली तरी अनेक ठिकाणच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निकालानंतर आता राज्यातील विविध पक्षांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेनं सरकारच्या कामकाजावर विश्वास दाखवला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पोचपावती दिली आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. (Nagar Panchayat Election 2022 Live Updates)

आत्तापर्यंत जाहीर झालेल्या जागांवर भाजप (BJP) क्रमांक एकचा पक्ष ठरला असल्याचा असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. यापुढेही आम्ही तुम्हाला पुरुन उरु, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतील (MVA) लगावला आहे. मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले, निवडणुकांचे गेले पाच वर्षातील हे निकाल पाहिले तर तुम्हाला उत्तर मिळेल. आपण निकाल तपासून पहा. कुठला पक्ष मोठा यापेक्षा त्यांचा नंबर पाहिला जातो. महाविकास आघाडीचा हा विजय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी निवडणुकांच्या शेवटी कामाची पावती मिळत असते, त्याची पावती महापालिका निवडणुकीतही मिळेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळ कोकणच्या राजकीय वातावरणाविषयी ते म्हणाले, कोकण आणि शिवसेना हे जुनं गणित आहे. कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केलं आहे. या निवडणुकीत हे दिसलं आहे. त्यांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. राणे प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करतात, मात्र यंदा त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

एकेकटं लढण्यात आम्ही हे सिद्ध केलंय की, ओबीसी राजकीय आरक्षण गेल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या सहा पोटनिवडणुका असतील, ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील, विधानपरिषदेच्या निवडणुकीत, पंढरपूरलाही तसेच आजच्या नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही आम्ही हे सिद्ध केलंय की भाजपचं महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष असल्याचं चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT