minister anil parab first reaction After 11 hours of ED interrogation maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'अंधेरी पोटनिवडणूक 'मविआ' म्हणून लढवणार', परब आणखी काय म्हणाले? वाचा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेना कोणाची यावरून सध्या शिंदे गट आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व निवडणूक मविआ एकत्र लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेत अनिल परब यांनी केली आहे. या निवडणूकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केल्याचे देखील परब यांनी सांगितले. निवडणूकीसाठी गुरुवारी 13 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेले.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे, ही पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडूतर्फे लढवण्यात येणार आहे. असे अनिल परब यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राखी जाधव उपस्थित होते.

या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे, असे परब यांनी सांगितले. निवडणूकीसाठी १३ तारखेला सकाळी ११ वाजता नॉमिनेशन दाखल करण्यात येणार आहे, आणि त्यासाठी सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित असतील असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT