Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'दिवाळीत पुन्हा भूकंप, अजित पवार शांत बसणार नाहीत', अंजली दमानियांच्या दाव्याने पुन्हा चर्चेला उधाण

येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील, असा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूकंप टाळला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अजित पवार यांचं बंड थांबलं नसल्याचं अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे.

'अजित पवार भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही. येत्या काही दिवसात, महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा काही दगाफटका करतील यात शंका नाही, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाल्या की, शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत, असं दमानिया म्हणाल्या आहेत.

तर पुढे दमानिया म्हणाल्या की, शरद पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस आहे. येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील, असा दावाही दमानिया यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT