Anjali Damania Criticse on Cm Devendra Fadanvis
Anjali Damania Criticse on Cm Devendra Fadanvis 
महाराष्ट्र

महाराष्ट्र फडणवीसांना माफ करणार नाही : अंजली दमानिया

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सिंचन घोटाळ्यातील फाईल्स एसीबीने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र फडणवीसांना कधीही माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एसीबीने काढलेल्या या पत्रात असलेले प्रकल्प लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्याचा सिंचन घोटाळ्याशी फारसा संबंध नाही. आणि ही क्लिन चीटसुद्धा नाही. परंतु अजित पवार यांना उप-मुख्यमंत्री केल्यानंतर घोटाळ्याच्या फाईल्स आज न उद्या बंद केल्या जातील यात काहीच शंका नाही'.

दरम्यान, विदर्भातील सिंचन घोटाळ्यातील नऊ फाईल्स आज(ता.25) लाचलुचपत विभागाकडून बंद करण्यात आल्या आहेत. त्यांनंतर अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिन चीट दिली असल्याच्या बातम्या समोर आल्या. परंतु, यानंतर लाचलुचपत विभागाने खुलासा केला असून बंद केलेल्या फाईलींशी अजित पवार यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. फाईल बंद होणं ही रुटीन प्रोसेस असल्याचे एसीबीकडून सांगण्यात येत असले तरी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच या फाईल कशा बंद झाल्या असा प्रश्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT