Anna has postponed her fast 
महाराष्ट्र बातम्या

Breaking News : आखिर अण्णाजी मान गए... भाजप मंत्र्यांनी केलेल्या मनधरणीनंतर उपोषण स्थगित

अशोक निंबाळकर

अहमदनगर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यात भाजपला यश आले आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी त्यांची मनधरणी केली.

दुपारपासून भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील नेते अण्णांना उपोषणापासून परावृत्त करण्यात मग्न होते. परंतु अण्णा आपल्या मागण्यांवर ठाम होते. यापूर्वी दिलेली आश्वासने पाळा मगच पुढचे बोला, असे त्यांचे म्हणणे होते.

शेवटी केंद्र सरकारने मागण्यांसंदर्भातील एक मसुदाच तयार करून आणला होता. अण्णांना त्यांनी पंधरा मुद्दे दिले आहेत. ते आपण कसोशीने पाळू, असे त्यांनी सांगितल्यानंतर अण्णा राजी झाले. पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली. या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आज सुमारे चार तास झालेल्या चर्चेनंतर हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला. भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांवर अण्णा राजी झाले आहेत. मात्र, हेही एक आश्वासनच आहे. हमीभावाची हमी नाहीच.

हजारे म्हणाले, की  राष्ट्रहितासाठी आंदोलने करावी लागतात. लोकांचा तो अधिकार आहे. अन्याय, अत्याचार होत असेल, तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे आवश्यक असते. म्हणून मी अनेक वर्षे आंदोलन करीत आहे. या वर्षी शेतकर्यांचे प्रश्न मांडले. पीक उत्पादन केल्यानंतर त्याचा खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी मी आग्रही राहिलो.

शेतकऱ्यांना उत्पादित खर्चासह 50 टक्के अतिरिक्त दर मिळावा, अशी मागणी अनेकदा केली. त्यासाठीच उद्यापासून उपोषण करण्याचे ठरविले होते. आज केंद्रातील मंत्री येथे आले. त्यांनी आपल्या 15 मुद्दे असलेल्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यासाठी लवकरच समिती स्थापन होऊन शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय होणार आहे.

केंद्र सरकार याबाबत चांगला निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे हजारे यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT