Uddhav_Thackeray_Anna Hazare 
महाराष्ट्र बातम्या

अण्णा हजारे पुन्हा आंदोलन छेडणार; CM उद्धव ठाकरेंना दिला इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना इशारा देताना म्हटलं...

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आता पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. तसा इशाराच त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकायुक्त कायदा करायला चालढकल करत असल्याचा आरोप करताना कायदा करा अन्यथा पदावरुन पायउतार व्हा, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. (Anna Hazare to start agitation aginst MVA Govt given warning to CM Uddhav Thackeray)

हजारे म्हणाले, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यांमध्ये जिल्हा स्तरावरील बैठका सुरु झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात आज कमीत कमी दोनशे कमिट्या स्थापन झाल्या. लवकरच या कमिट्यांच्या बैठका झाल्या, बांधणी झाली की महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि एकाच वेळेला ३०० तालुक्यांमध्ये आम्ही लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन छेडणार आहोत. लोकायुक्त कायदा करा नाहीतर पायउतार व्हा, असा थेट इशाराही अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दरम्यान, दोन वर्षे झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकायुक्त कायद्यावर बोलायला तयार नाहीत असा आरोपही अण्णा हजारे यांनी केला आहे. तसेच मुख्यंमत्र्यांचे कान कोणी टोचलेत? असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT