Anna Hazare  esakal
महाराष्ट्र बातम्या

Anna Hazare : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अण्णा हजारे कोर्टात जाणार; काय म्हणाले अण्णा?

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हाडांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

'ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी करुन सोबत अण्णा हजारे यांचा फोटो जोडला होता.

त्यानंतर गुरुवारी सायंकाळी अण्णा हजारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंबंधी वकिलांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे?

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्वीटसंदर्भात बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, देशाचं वाटोळं केलं असं म्हणत असतील. पण मी एवढे कायदे केलेत त्यामुळे जनतेचा फायदा झाला आहे. माहितीचा अधिकार आज देशाला मिळाला आहे.

अण्णा पुढे बोलले की, माझ्या काही आंदोलनांमुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. यांचे बरेच कार्यकर्ते घरी गेले. ते त्यांना सहन होत नसेल म्हणून काहीतरी कुरापत काढायची आणि बदनामी करायची.

याने काही फरक पडत नाही. वकिलांचा सल्ला घेऊन ज्याने असं म्हटलं आहे त्याच्यावर अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासंदर्भात विचार करणार आहे, असं अण्णा हजारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT