महाराष्ट्र बातम्या

उत्पन्न वाढवा, बक्षीस मिळवा!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक विभागाने सुरू केलेल्या ‘उत्पन्न वाढवा’ विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या एसटी आगारांना दरमहा दोन लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने १ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान ‘उत्पन्न वाढवा’ विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिल्याच बैठकीत दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली. परब यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. 

त्यानुसार एसटी महामंडळाच्या २५० आगारांची प्रदेशनिहाय विभागणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगाराला दरमहा दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या आगाराला दीड लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या आगाराला एक लाख अशी बक्षिसे दिली जातील.

एसटी महामंडळाच्या ३१ विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला दोन लाख, द्वितीय क्रमांकाला दीड लाख आणि तृतीय क्रमांकाला सव्वा लाख रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येतील. विशेष म्हणजे, या स्पर्धात्मक अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना बक्षिसाने गौरवण्यात  येणार आहे.

निकृष्ट कामगिरीबद्दल शिक्षा
निकृष्ट कामगिरी असलेल्या आगारातील संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यानुसार निकृष्ट कामगिरी असलेल्या आगारातील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा कारवाई करणे, असे शिक्षेचे स्वरूप राहील, असे परब यांनी सांगितले. त्यामुळे केवळ बक्षिसासाठी नव्हे; तर शिक्षेपासून वाचण्यासाठी सर्व २५० आगारांनी कार्यक्षमता वाढवावी हा हेतू आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT