Ajit Pawar Twitter
महाराष्ट्र बातम्या

सरकारला लागोपाठ दुसरा झटका; अजित पवारांच्या मालमत्तेवर IT विभागाची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा झटका लागला आहे. कारण अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली असून हा महाविकास आघाडीला दुसरा झटका मानला जात आहे. या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या कारवाईअंतर्गत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची प्रॉपर्टी 'अटॅच' करण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून 90 दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे.

कुठे कुठे कारवाई?

आयकर विभागाने केलेल्या बेनामी मालमत्तेवरील कारवाईमध्ये हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता आहे. या मालमत्तेवर कारवाई होत असून ती प्रोव्हीजनली अटॅच करण्यात आली आहे. यामध्ये 600 कोटींची जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता, साऊथ दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट, 25 कोटींचे मुंबईतील निर्मल हाऊस, गोव्यातील निलाय नावाचे रेसॉर्ट तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 27 ठिकाणच्या जमिनी समाविष्ट आहेत. ही सारी मालमत्ता 'बेनामी' ठरवण्यात आलं आहे. ही मालमत्ता बेनामी नसल्याचं आता अजित पवार यांना सिद्ध करावं लागणार आहे, त्यासाठी त्यांना 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT