Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला; सुप्रिया सुळे संतापल्या!

Latest Marathi News: महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.

Sandip Kapde

Supriya Sule: महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक घसरणीवरून वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान पुन्हा एकदा मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदा सुप्रीया सुळे संतापल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे."

"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातीर तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे", असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यापूर्वी राज्यातून वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग गेले. विद्यमान सरकारमुळे दुसऱ्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT