police google
महाराष्ट्र बातम्या

अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब, आयुक्त संजय पांडेंना पत्र

पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांचा सीबीआयने जबाब नोंदवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांचा सीबीआयने जबाब नोंदवला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींचा वेग वाढला आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी आणखी एक लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात काही अधिकाऱ्यांची नाव आणि नवलानी विरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम योग्य तपास न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (letter bomb from Anup Dange)

दरम्यान, याप्रकरणी तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डांगे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. उच्च न्यायालयाने नवलानी विरोधात दाखल असलेला गावदेवी पोलिस ठाण्यातील गुन्हा रद्द केला आहे. या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊन पुन्हा समुळ तपास केला जावा अशी मागणी पोलिस अधिकारी अनुप डांगे यांनी केली आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांचा सीबीआयने जबाब नोंदवला आहे. डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. याआधी सीआयडी आणि एसीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परमबीर सिंग यांच्याविरोधातील सगळी प्रकरण सीबीआयकडे देण्यात आली आहेत. सीबीआयकडून सर्व प्रकरणातील फिर्यादीचा जबाब दिल्ली येथील मुख्य सीबीआय कार्यालयात नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT