महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात आणखी एक याचिका 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर करण्याची शक्‍यता आहे. ऍड. संजित शुक्‍ला यांनी आरक्षणाविरोधात केलेली ही दुसरी याचिका आहे. 

76 हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचीही मागणी याचिकादाराने केली आहे. मराठा समाज सधन आहे. शेती, सहकार क्षेत्रामध्ये बहुतांश समाज प्रस्थापित आहे. अशा समाजाला सामाजिक किंवा शैक्षणिक मुद्द्यावर आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. शुक्‍ला यांनी 2014 मध्येही आरक्षणासंबंधित सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका न्यायालयात केली होती. त्या वेळेस तत्कालीन खंडपीठाने दिलेली स्थगिती कायम असून, सरकारने प्रथम आरक्षणाच्या निर्णयांची माहिती न्यायालयाला देणे बंधनकारक आहे; मात्र राज्य सरकार अशी माहिती देत नाही, असाही आरोप याचिकादाराने केला आहे. दरम्यान, येत्या सोमवारी न्यायालयात नव्या आणि जुन्या अशा दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका केली आहे; मात्र खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire Breaks Out at Mahape MIDC : नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये अग्नितांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अमेरिकेत भारतीयानं पत्नीसह ३ नातेवाईकांची केली हत्या; घरात सापडले ४ मृतदेह

Neelam Gorhe: धक्कादायक! प्री प्रायमरी शाळा गुमास्ता लायसनवर, सरकारी नियंत्रण नाही; उपसभापती गोऱ्हेंची माहिती

Viral Video : "रोज 300 रुपये हप्ता घेऊनही माझ्या दुकानावर कारवाई का केली?" डोंबिवलीत मराठी तरुणीचा टाहो; भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi news Live Update: नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील कंपनीला आग

SCROLL FOR NEXT