Accident News 
महाराष्ट्र बातम्या

Accident News : कार कागदासारखी हवेत उडाली! समृद्धी महामार्गावरील अपघातात आणखी एक बळी

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर : शिरपूर जैन येथील रहिवासी व अकोला येथे दोघे पतीपत्नी लेडी हार्डिंग येथे परिचारक या पदावर कार्यरत असलेले सुशीलकुमार दिलीप थोरात (४०) हे आपल्या पत्नी व मुलीसह शिर्डीला देव दर्शनासाठी गेले होते. मात्र अकोला येथे परत येत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात होऊन सुशील थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

सुशीलकुमार यांची पत्नी व पाच वर्षाची मुलगी ही सुदैवाने बचावली आहे. सदर अपघात करमाड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जयपूर – भांबरडा (जि.संभाजीनगर) शिवारात ०३ जुलै २०२३ रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. स्विफ्ट कार क्र. एम.एच.३० बी.बी. ९७९३ महामार्गाच्या खाली ३० फुट खाली कोसळली. एखादा कागद उडावा अशी कार हवेत उडून कोसळली. अपघातामध्ये कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

अपघाताच्या आवाजाने भाम्बर्डा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून व करमाड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन जागीच ठार झालेले सुशीलकुमार थोरात यांचा पार्थिव देह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.व जखमीं पत्नी बबिता वय ३४ व मुलगी अद्वितीय वय ५ वर्ष यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे हलवले. सुशील थोरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ भावजय असा आप्त परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT