Mumbai High Court sakal media
महाराष्ट्र बातम्या

Malegaon blasts : आणखी एक साक्षीदार फितूर! आत्तापर्यंत २५ जणांनी बदलली साक्ष

या खटल्यात आत्तापर्यंत २६० हून अधिक साक्षीदारांनी जबाब नोंदवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एका साक्षीदारानं आज फितूरी केली. या खटल्यातील हा २६वा साक्षीदार आहे ज्यानं विरोधी भूमिका घेतली आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वीच २५ व्या साक्षीदारानं फितूरी केली होती. (another witness in the 2008 Malegaon blasts case has turned hostile)

पंधरा दिवसांपूर्वी अर्थात २६ ऑगस्ट रोजी या प्रकरणातील २५ वा साक्षीदार फितूर झाला होता. या सेवारत लष्करी अधिकाऱ्यानं पूर्वीची तपास यंत्रणा एटीएसला जबाब देण्यास नकार दिला होता. या साक्षीदारानं विशेष एनआयए न्यायालयात आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला ओळखलं होतं. पण त्यानं नंतर आपली साक्ष बदलली होती.

साक्षीदारानं न्यायालयाला सांगितलं होतं की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्याची फक्त चौकशी केली पण त्याचं म्हणणं नोंदवून घेतलं नाही. आपण आरोपपत्रात दिलेल्या जबाबातील मजकूर नाकारण्यात आला. या खटल्यादरम्यान आतापर्यंत २६० हून अधिक साक्षीदारांनी जबाब नोंदवला आहे.

दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी २४ व्या साक्षीदारानं साक्ष फिरवली होती. विशेष एनआयए न्यायालयात आरोपी सुधाकर चतुर्वेदीच्या संबंधित साक्षीदार न्यायालयात जबाब नोंदविण्यासाठी आला होता. मात्र एनआयएला काय जबाब दिला होता आपल्याला आठवत नाही, अशी साक्ष त्यांनं न्यायालयात दिली. त्यामुळं त्याला अभियोग पक्षाने फितूर घोषित केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT