chhaganbhujbal 
महाराष्ट्र बातम्या

निराधार, दिव्यांग कारागिरांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  - ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा दिव्यांग किंवा ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्‍चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अशांना, ग्रामीण कारागिरांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य, दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यात येतो. एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, विधवा, ६० वर्षांवरील वृद्ध, ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध नाही आदींचा या योजनेत समावेश आहे. आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी), भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर उदा. कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, तसेच झोपडपट्टीतील रहिवासी विशिष्ट क्षेत्रात रोजंदारीवर काम करून उपजीविका करणारे नागरिक जसे हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे आणि फूल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे. तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे, कुष्ठरोगी/बरा झालेला कुष्ठरोगी असलेली कुटुंबे, या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. 

या वेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक व दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT