पोलिस वर्दी  Sakal
महाराष्ट्र बातम्या

‘फोन-पे’वर मागितली ‘API’ने लाच! १०० कोटीच्या वसुलीचा पोलिसांवरील पुसेना ठपका

पासपोर्ट अर्ज पडताळणीसाठी फोन पेवरून दीड हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) अटक केली.

तात्या लांडगे

सोलापूर : शंभर कोटी वसुलीच्या आरोपानंतर पोलिस खात्याची मोठी बदनामी झाली आहे. मलिन झालेली प्रतिमा पुन्हा सुधारावी म्हणून प्रामाणिक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. पण, काही मोजक्या लाचखोरांमुळे पुन्हा एकदा पोलिस खाते नागरिकांच्या नजरेत बदनाम झाले आहे. शहरात तीन दिवसांत दोन पोलिस अधिकारी लाच प्रकरणात जेरबंद झाले आहेत.

राज्यातील महसूल व पोलिस हे दोनच विभाग लाचखोरीत अव्वल आहेत. जानेवारी ते २६ जून २०२२ या सहा महिन्यांत पोलिस खात्यातील १०९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याचे व मागितल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला तीन महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यातच लाच घेताना रंगेहाथ पकडला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. २४) त्याच पोलिस ठाण्याशी संलग्नित रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून मासिक हप्ता घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याची चौकशी सुरू असतानाच पासपोर्ट अर्ज पडताळणीसाठी फोन पेवरून दीड हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) अटक केली. १० जून रोजी शिंदे याने त्याचा हस्तक सलाउद्दीन लायकअली मुल्ला याच्या फोनवर पैसे पाठवायला सांगितले होते. त्याची पडताळणी करून लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी पोलिसांची प्रतिमा उंचवावी, लाच कोणीही घेऊ नये म्हणून एक पत्रकच काढले होते. आता विद्यमान पोलिस आयुक्त राजेंद्र माने हे दररोज सर्वांना आवाहन करतात, तरीपण काहीजण लाच घेतातच, अशी स्थिती आहे. पोलिस खात्याच्या बदनामीला कारणीभूत तशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता थेट निलंबित केले जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

पोलिस खात्याची बदनामी होऊ नये, लोकांना पोलिसांचा आधार वाटावा असे काम सर्वांनीच करणे अपेक्षित आहे. दररोज हजेरीच्या वेळी सर्वांनाच तसे आवाहन केले जाते. दुसरीकडे, नागरिकांनीही आपल्या कामासाठी कोणी पैसे मागत असल्यास थेट आम्हाला भेटावे.
- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

नागरिकांनी १०६४ वर करावी थेट तक्रार


नागरिकांच्या तक्रारीवरून आम्ही कारवाई करतो. पोलिस आणि महसूल विभागाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. सर्वसामान्यांची कामे करण्यास कोणी पैसे मागत असेल, तर त्याची थेट तक्रार १०६४ या क्रमांकावर करावी. संबंधितावर निश्चितपणे कारवाई होईल. तक्रारदाराचे नाव उघड केले जात नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांनी यावेळी सांगितले.

ऑडिओ रेकॉर्डिंगवरही नाही जनतेला भरवसा


पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून, त्यामध्ये चित्रीकरणासोबतच आवाजही रेकॉर्ड होणार आहे. त्यामागे लाचखोरी, पोलिसांची बदनामी, पोलिसांवरील आरोप थांबतील, असा हेतू आहे. पण, या उपायानंतरही पोलिस लाच घेतीलच. पोलिस ठाण्याजवळील हॉटेल, चहा कँटीन किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून दूर जाऊन लाचेचे प्रकार सुरू राहतील, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यावर आता वरिष्ठ पोलिस अधिकारी काय ठोस उपाय करतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT