Palghar APMC Election 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

APMC Election 2023: शिंदे गटाचा सुपडा साफ! पालघर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

रुपेश नामदास

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होत आहेत.

यातच महाविकास आघाडीने शिंदे गटाला चांगलाच धोबापछाड दिला आहे. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा रोवला. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने शिंदे गटाला धक्का दिला आहे.

पालघर बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला साधं खात ही उघडता आलं नाही. या निवडणुकीत १५ जागा महाविकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीत दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने एकूण सदस्य संख्या १७ झाली. पालघर बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

खेड बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा 

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. तरी देखील या निवडणुकीत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे.

राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीवर तनपुरेंच वर्चस्व

अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

अखेर या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. तनपुरे गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवत राहुरी बाजार समितीवर 20 वर्षांपासूनची एकहाती सत्ता कायम ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT