महाराष्ट्र बातम्या

Apmc Election Result: कर्जत बाजार समितीवर पुन्हा भाजपची सत्ता? राम शिंदेंनी सांगितला फॉर्म्युला

सकाळ डिजिटल टीम

कर्जत, ता. ३० : कर्जत येथे बाजार समितीचा निकास जाहीर झाल्यावर भाजपच्या एक हाती वर्चस्वाला रोहित पवार यांनी सुरूंग लावला या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीलाच्या गटाला समसमान जागा मिळाल्या आहेत.

दोन्ही गटाला ९-९ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राम शिंदे यांनी नूतन संचालक सत्कार सोहळ आयोजित केला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जरी बरोबरीत सुटलो असलो तरी ईश्वर चिठ्ठीने सत्ता आपलीच येईल, अशी इच्छा राम शिंदे यांनी व्यक्त केली.

कर्जत येथे बाजार समितीच्या भाजप-मित्रपक्ष युतीच्या नूतन संचालक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील गावडे, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, ज्येष्ठ नेते प्रवीण घुले, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व काकासाहेब तापकीर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील यादव, युवा नेते अनिल गदादे, शहर अध्यक्ष गणेश क्षीरसागर, शेखर खरमरे, पप्पू धोदाड, राहुल गांगर्डे, धनंजय मोरे, अमृत लिंगडे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले ज्यांना भीती वाटते. ते कालच सर्व नूतन नऊ संचालकांना पळून घेवून गेले. निवडणुकी पूर्वी आमचे दोन उमेदवार फोडले होते. नाही तर आमचे अकरा संख्या झाली, असती तर दोन उमेदवार हे केवळ दोन व तीन मताने पराभूत झाले. नाही तर तेरा विरूद्ध पाच असा सामना झाला असता. आपला पराजय झाला आहे, असे समजण्याचे कारण नाही.

अंबादास पिसाळ म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जवळचा व गावातील म्हणून समोरील बाजूस दोन चार मते दिल्याने व काळजी घेऊन सुद्धा चार उमेदवार पडले आहेत. सभासद हलगर्जीपणा नडला. हा अनुभव उद्याच्या निवडणुकीत दुरूस्ती करण्याची गरज असून नशीबाची परीक्षावरच बाजार समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची परीक्षा होण्याची शक्यता आहे.

प्रविण घुले म्हणाले की, तळागाळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. अधिक संघटन मजबूत करण्याची गरज आहे. यावेळी काकासाहेब तापकीर,संपत बावडकर ,राहुल जामदार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शेखर खरमारे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC बंडखोरांना राज्यात १३०० मतं मिळवू न शकलेल्या पक्षाचा आधार, शून्यावरून थेट २० खासदार; NCPIचा इतिहास काय? कोण चालवतं?

सरळसेवा पदभरतीची महत्त्वाची फाईल गहाळ, राजशिष्टाचार विभागात खळबळ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Vegetable Prices : किचनचे बजेट कोलमडले! टोमॅटो 80 तर वांगी 120 रुपये किलो; पाहा तुमच्या आवडीच्या भाज्यांचे ताजे दर, फळेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

VIRAL VIDEO: जिंकण्यापूर्वीच खेळाडू सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात धावले, फिल्डरची चतुराई पाहून सारेच चक्रावले; अम्पायरही गोंधळले

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

SCROLL FOR NEXT