Ladki Bahin Yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अ‍ॅप व पोर्टल पडले बंद, महिला त्रस्त!

Solapur News: अनुदान जमा होणार असल्यामुळे महिला सातत्याने मोबाईलवर ऑनलाईन माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पळापळ करू लागल्या.

हुकूम मुलाणी ​

Mangalvedha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मोठा गाजावाजा केला असला तरी सध्या या अर्ज भरण्याचे ॲप आणि पोर्टल चालत नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाय्रा महिलामधून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होवू लागला.

गत महिन्यात महिन्याभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली यासाठी महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी सरकारने निश्चित केलेल्या अटीत वारंवार बदल होत होत्या.

अटीच्या बदलाला सुरुवातीच्या काळात महिला त्रस्त झाल्या असतानाच गेले काही दिवसापासून या योजनेसाठी शासनाने नव्याने विकसित केलेले नारीदूत हे ॲप चालत नाही तर लाडकी बहीण पोर्टल देखील गेले काही दिवसापासून बंद असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिला त्रस्त झाल्या. राखी पौर्णिमेपर्यंत या योजनेचे अनुदान जमा होणार असल्यामुळे महिला सातत्याने मोबाईलवर ऑनलाईन माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पळापळ करू लागल्या.

दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ज्या महिलांनी अॅप व पोर्टल द्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा मोबाईल संदेश आला तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूर झाले असून त्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना मोबाईल द्वारे दिल्या आहेत मात्र त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या मात्र पोर्टल आणि ॲप बंद असल्यामुळे महिला आणखीनच त्रस्त झाल्या.

अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान लवकर जमा होणार आणि अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्या महिलांचा रोज सरकारवर साहजिकच निर्माण होऊ लागला आहे. योजनेचे अनुदान सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या बहीण असलेल्या महिलांना इतका त्रास दिला जात आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात चालणार की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

Pune Crime: आजोबाच्या अंत्यविधीसाठी एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या नातवाला लुबाडले, पुण्याच्या औंध भागातील घटना

Jalgaon News : तासाभरापूर्वीच वडिलांशी बोलणे, नंतर मृत्यूचीच बातमी; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

Thane Water Supply: उल्हासनगरात पुन्हा टँकरराज, ४५० कोटींच्या योजनांनंतरही पाणीटंचाई कायम

Pune Crime : पर्वतीमध्ये पूर्ववैमनस्यातून महिलेचे घर पेटवले

SCROLL FOR NEXT