solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

‘पेट’साठी परदेशातील चौघांचे अर्ज! एकूण अर्ज 4288; तीन सत्रात परीक्षा 30 जुलैला, पहिल्यांदाच वेब बेस्ड्‌ प्रणाली, नक्की वाचा, अन्यथा पेपरमधून अचानक व्हाल बाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ‘पीएच.डी.’च्या 474 जागांसाठी सोलापूरसह परजिल्ह्यातील, परराज्यासह परदेशातील एकूण 4288 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठातर्फे या सर्वच विद्यार्थ्यांची 30 जुलैला तीन सत्रात ‘पेट’ घेतली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ‘पीएच.डी.’च्या ४७४ जागांसाठी सोलापूरसह परजिल्ह्यातील, परराज्यासह परदेशातील एकूण चार हजार २८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात भारतातीलच पण सध्या अमेरिका, इंग्लंड या देशात नोकरी तथा उच्चशिक्षणासाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठातर्फे या सर्वच विद्यार्थ्यांची ३० जुलैला तीन सत्रात ‘पेट’ घेतली जाणार आहे.

‘पेट’ यंदा वेब बेस‌ होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी संगणक, लॅपटॉपचा वेब कॅमेरा सुरू करावा लागणार आहे. मोबाईलवर परीक्षा देताना मध्येच कॉल आल्यास तो विद्यार्थी परीक्षेतून आपोआप बाहेर पडणार आहे. त्यामुळे पेपर देताना मध्येच कॉल येणार नाही, याची खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. तर विद्यार्थ्याला त्या कॅमेऱ्यासमोरून नजर हटविता येणार नाही. दोनदा नजर कॅमेऱ्यासमोरून इतरत्र गेल्यावरही आपोआप पेपरमधून तो विद्यार्थी बाहेर पडणार आहे. संगणक, लॅपटॉपवर दुसरी विंडोज उघडल्यावरही विद्यार्थी बाहेर पडेल, अशी यंत्रणा ‘वेब बेसड्’‌मध्ये असणार आहे. प्रत्येक पाच सेकंदाची इमेज रेकॉर्डिंग होणार आहे.

पहिल्यांदाच पीएच.डी.पूर्व ‘पेट’ ऑनलाइन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच पीएच.डी.पूर्व ‘पेट’ ऑनलाइन पद्धतीने वेब बेसड्‌ पद्धतीने घेतली जात आहे. त्यासाठी व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, बोर्ड ऑफ स्टडीजची मान्यता मिळाली आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेट’चे नियोजन केले आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

‘पेट’साठी आलेले अर्ज

  • सोलापूरमधील अर्ज

  • २,१२५

  • राज्यातील एकूण अर्ज

  • २,०९५

  • परराज्यातील अर्ज

  • ६८

  • परदेशातील अर्ज

  • एकूण अर्ज

  • ४,२८८

‘पेट’चे असे नियोजन

‘पेट’ देण्यासाठी २५ व २६ जुलैला पूर्व तयारीची ऑनलाइन मॉक टेस्ट होणार आहे. एका विषयातून व एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा ३० जुलैला होणार आहे. ही परीक्षा तीन सत्रात म्हणजेच सकाळ, दुपार व सायंकाळचे सत्र असतील. दोन सत्रात दोन तासांचे अंतर असणार आहे. ‘पेट’साठी दोन पेपर असणार आहेत. पहिल्या सत्रात एक पेपर होईल आणि दुसऱ्या सत्रात दोन तासानंतर दुसरा पेपर देता येणार आहे. परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT