महाराष्ट्र बातम्या

रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी यांची नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ (Rajnish seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आलं होतं. मात्र, राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारलं होतं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. (New DGP Maharashtra)

विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी होती. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली होती. पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते.

ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यातील अंतिम तीन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे, असे याचिकेत स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता यातून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

मुंबईची पहिली महिला BMC कमिश्नर! देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी कशा बनल्या अश्विनी भिडे? जाणून घ्या रिअल स्टोरी...

गुगलवर 'फिमेल सर्व्हीस' सर्च करणं पडलं महागात; महिलांनी भेटायला बोलावलं अन्...; धक्कादायक घटना समोर

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे, पावसाचा इशारा

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

SCROLL FOR NEXT