महेश कोठे ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

राज्यात नवीन १५९ महाविद्यालयांना मंजुरी! महेश कोठेंना विधी महाविद्यालयाची लॉटरी

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील दहा अकृषिक विद्यापीठाअंतर्गत १५९ महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यात सोलापूर शहरातील स्व. विष्णूपंत (तात्यासाहेब) कोठे विधी महाविद्यालयाचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महेश कोठे हे त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह १० जुलैला पंढरपुरात भेटले होते. १५ जुलैला त्यांचा विधी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील दहा अकृषिक विद्यापीठाअंतर्गत १५९ महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यात सोलापूर शहरातील स्व. विष्णूपंत (तात्यासाहेब) कोठे विधी महाविद्यालयाचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महेश कोठे हे त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह १० जुलैला पंढरपुरात भेटले होते. १५ जुलैला त्यांचा विधी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

बारावी किंवा पदवी शिक्षण घेतल्यानंतर बहुतेक विद्यार्थी डिझाईन, विधी, मानवविज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेतून शिक्षण घ्यायला पसंती देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात या वर्षीपासून नवीन १४ विधी महाविद्यालये सुरु होणार आहेत. मुंबई व एसएनडीटी विद्यापीठाअंतर्गत डिझाईन शाखेची महाविद्यालये वाढणार आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाअंतर्गत २८, एसएनडीटी विद्यापीठाअंतर्गत सर्वाधिक ५५, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाअंतर्गत २१, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत आठ, कवयीत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावअंतर्गत पाच, गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत तीन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत तीन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरअंतर्गत पाच, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेअंतर्गत १८ आणि स्वामी रामानंद तिर्थ, मराठवाडा विद्यापीठ नांदेडअंतर्गत १३ महाविद्यालये सुरु होणार आहेत.

जिल्ह्यात ‘ही’ नवी महाविद्यालये
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात कण्हेरसिध्द बहुद्देशीय संस्था, कण्हेर, ता. माळशिरसअंर्तगत शिवशंभो महाविद्यालयात बीएससी व बीए-भाग एक सुरु होणार आहे. तर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबादअंतर्गत सौ. प्रेमाताई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौडगाव, ता. बार्शी येथे बीए, बीएससी, बी-कॉम भाग-एक सुरु होणार आहे. तसेच संभाजीराव शिंदे विद्यामंदिर, मुरारजी पेठअंतर्गत स्व. विष्णूपंत (तात्यासाहेब) कोठे विधी महाविद्यालय सुरु होणार आहे. त्याठिकाणी बीएएलएलबी-भाग एक आणि एलएलबी-भाग एक सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT