महाराष्ट्र बातम्या

प्रयोग करायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का? 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः कोरोनाच्या महामारीत 15 जूनपासून शाळा सुरु करण्याच्या हालचाली शासन करत आहे. शासनाच्या या निर्णयाला सोशल मिडियातून विरोध सुरु झाला आहे. सोशल मिडियातून याबाबत अनेक प्रश्‍न सरकारला विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची उत्तरे देता आली तर नक्कीच शाळा सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात प्रयोग करायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का? असा सवालही सोशल मिडियातून शासनाला विचारला जात आहे. 

सोशल मिडियातून विचारले जाणारे प्रश्‍न पुढीलप्रमाणे. कोरोनावर खात्रीशिर औषध सापडले आहे का? लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का? प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी बसवाल. पण, सध्या एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी दाटीवाटीने बसविले जातात. त्या पटसंख्येच्या मानाने जास्त बेंच व खोल्या लागतील. त्या कशा उपलब्ध करणार? 
शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार? मधल्या सुट्टीत टॉयलेटमध्ये गर्दी होते, त्याचे नियोजन काय? 
जिथे शहाणी माणसे ऐकत नाहीत तिथे लहान मुले ऐकतील का? मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतेय सांगता येते. लहान मुले सांगु शकतील का? सर्व व्यवस्थित आहे, हे दाखविण्यासाठी शाळा सुरू करायच्या आहेत का? 
या तीन महिण्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळुन पाहिले आहे. तरी ते शाळेत पाठवतील का? 
प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्‍य आहे का? पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण, नंतर दुर्लक्ष होणार नाही का? स्कुल बस, रिक्षावाले, मुलांची ने आण करताना नियम पाळतील? उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांचा प्राण गेला तर शाळा मुलांच्या पालकांना दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देतील का? शाळांनी विद्यार्थ्यांचे इन्शुरन्स काढले आहेत का? कारण बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा दोन अपत्ये आहेत. जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार? असे अनेक प्रश्‍न सोशल मिडियावर सरकारला विचारले जात आहेत. 


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT