solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तालयात जाताय का?, मग गेटवर पहिली नोंद करा; भेटण्याचे कारण, मोबाईल नंबरही द्यावा लागतो; वाहने मात्र ‘नो पार्किंग’च्या फलकासमोरच

पोलिस आयुक्त, उपायुक्तांसह अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास भेटण्यासाठी पोलिस आयुक्तालयात जाण्यापूर्वी अगोदर गेटवर भेटणाऱ्याचे नाव, कोणाला भेटायचे त्या अधिकाऱ्याचे नाव नोंदणी करावी लागते. त्यानंतरच गेटपासून पुढे सोडले जाते, अशी नवी पद्धत अवलंबली जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस आयुक्त, उपायुक्तांसह अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास भेटण्यासाठी पोलिस आयुक्तालयात जाण्यापूर्वी अगोदर गेटवर भेटणाऱ्याचे नाव, कोणाला भेटायचे त्या अधिकाऱ्याचे नाव नोंदणी करावी लागते. त्यानंतरच गेटपासून पुढे सोडले जाते, अशी नवी पद्धत अवलंबली जात आहे.

पोलिस ठाण्यात निवेदने दिली, अर्ज दिले तरी कार्यवाही, कारवाई होईना, यातून काहींनी पोलिस आयुक्तालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न यापूर्वी केले आहेत. याशिवाय आयुक्तालयात कोणीही विनाकारण येऊ नये, यासाठी आता आयुक्तालयात जाण्यापूर्वी गेटवर थांबलेल्या अंमलदाराकडे जाऊन भेटण्याचे कारण नमूद करावे लागत आहे. भेटणाऱ्याचे नाव, कोणाला भेटायचे त्या अधिकाऱ्याचे नाव, भेटण्याचे नेमके कारण या बाबी तेथे सांगाव्या लागतात. भेटणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील त्याठिकाणी द्यावा लागतो.

भेटून परत गेल्याची वेळ असा देखील रकाना त्या नोंदवहीत आहे, पण त्यात संबंधितांना विचारून काहीही लिहिले जात नाही. भेटायला येणाऱ्याला गाडी घेऊन आत सोडण्याचा प्रकार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांना भेटायला कोणी आले तर तेथूनच कॉल करून विचारणा होते आणि त्यानंतरच पुढे जाऊ दिले जाते. आयुक्तालयातील महिला (भरोसा सेल) कक्षासाठी अधिकारी व अंमलदारांना जायला आयुक्तालयाच्या गेटमधून आणि त्याठिकाणी तक्रार घेऊन आलेल्यांना बाहेरून दुसरा रस्ता आहे. तेथून अधिकारी, अंमलदारही ये-जा करतात. दररोज आयुक्तालयाच्या गेटजवळील झाडाखाली पोलिस अंमलदार बसलेले असतात. त्यांच्याकडे नोंदीची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाहने ‘नो पार्किंग’च्या फलकासमोर

पोलिस आयुक्तालयात कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे वाहन बाहेर रस्त्यालगतच लावावे लागते. तेथील एटीएम सेंटरजवळ (आयुक्तालयाच्या गेटच्या दोन्ही बाजूला) नो पार्किंगचे फलक आहेत. त्या फलकांसमोरच सध्या दुचाकी लावलेल्या दिसतात. पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यालगत वाहनांच्या रांगा देखील पहायला मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shibu Soren : तीनवेळा मुख्यमंत्री, पण एकदाही कार्यकाळ पूर्ण नाही; शिबू सोरेन यांचं निधन

Raksha Bandhan 2025 : पुण्यात रक्षाबंधनाची धूम; पारंपरिक ते आधुनिक राख्यांचे विशेष आकर्षण, ग्राहकांची गर्दी

Latest Marathi News Updates Live : हुकुमशाही अन् सनातनची साखळी तोडण्यासाठी शिक्षण हेच शस्त्र : कमल हसन

Bank Interest Rate: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तुमच्या EMIवर होणार परिणाम; व्याजदर वाढणार की कमी होणार?

'मला रडणं जमलं नाही, म्हणून कानशिलात मारली', पल्लवी जोशींच्या सांगितली वेदनादायक आठवण, म्हणाली...'बाबांसमोर मला मारलं आणि...'

SCROLL FOR NEXT