तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीनेही करू शकता Esakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्ही, तुमची मुले मानसिक तणावाखाली असतात का? ‘या’ गोष्टींचे पालन करा अन्‌ शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच मानिसकदृष्ट्या निरोगी राहा

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे जरुरी आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यास निश्चितपणे भविष्याचा यशस्वी मार्ग सापडतो. योग, प्राणायाम आणि ध्यान या गोष्टींचा उपयोग चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये होतो.

तात्या लांडगे

सोलापूर : शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे जरुरी आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यास निश्चितपणे भविष्याचा यशस्वी मार्ग सापडतो. योग, प्राणायाम आणि ध्यान या गोष्टींचा उपयोग चिंता, उदासपणा, हृदयरोग, अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये होतो. स्वतःकडे लक्ष केंद्रित करता येते, वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते आणि त्यातून मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते. कोणत्याही गोष्टीची हाव माणसाला कमकुवत करते. त्यामुळे आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगावे, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

पालक आपल्या मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुले मानसिक तणावाखाली असतात. शेजारच्या मुलाला चांगले गुण मिळाले आणि माझ्या मुलांना कमीच गुण पडले म्हणून पालकही मानसिक तणावात वावरतात. परीक्षा आली की दहावी- बारावीतील मुलेही मानसिक तणावात असतात.

नोकरदार देखील कार्यालयीन कामांच्या व्यापामुळे तर अनेकजण भौतिक सुखासाठी पैसा पैसा करत तणावाखाली राहतात. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवन या तिन्ही आघाड्यांवर काम करताना सध्या बहुतेकजण मानसिक स्वास्थ्य बिघडवू लागला आहे. पण, अशावेळी स्वत:साठी वेळ द्यावा आणि जे आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगणे महत्त्वाचे आहे. शेवटी जगाचा निरोप घेताना संपत्ती, पैसा अशा कोणत्याही भौतिक गोष्टी सोबत येत नाहीत. त्यासंदर्भात संत साहित्यातही अनेक वर्णने आहेत.

धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक दृष्टिकोनाचा आधार

जप, नामस्मरणातून मन शांत करणे, ध्यानधारणेतून मनःशक्ती वाढवणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीतून ‘स्व’चा शोध घेतला जातो. सध्याच्या संघर्षमय जीवनात मनःशांती आवश्यक वाटू लागली आहे. सभोवताली अनेक भौतिक गोष्टींची प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठीची स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन, या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. अशामुळे जीवनातील आनंदच हरवून बसतात. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवन या सर्व आघाड्यांवर लढता लढता लोक थकून जातात. मनात निर्माण होणारी चिंता, दुःख, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात, या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा लाभ होतो, असे तज्ज्ञ सांगतात.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, मानसिक स्वास्थ्य चांगले राहील

सध्या प्रत्येकजण पैसा, संपत्ती, नाव कमावण्याच्या मागे लागला असून त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याची वस्तुस्थिती आहे. अशावेळी पुरेशी शांत झोप, मनःशांती, शांत संगीत ऐकणे, छंद जोपासणे व सात्त्विक आहार यासोबतच ध्यान, योगा व सर्वांसोबत चांगले नातेसंबंध असल्यास निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकते.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

संत तुकाराम महाराज म्हणतात...

‘ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला भोग येतात, तेव्हा तेव्हा ते आनंदाने भोगावेत. त्या त्या परिस्थितीत आपण जसे आहोत त्यातच समाधान मानावे. कोणालाही त्याचा दोष न देता शांतपणे आणि समाधानाने त्याचा सामना करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT