puja khedkar sakal
महाराष्ट्र बातम्या

Puja Khedkar : शस्त्र परवाना रद्दची मनोरमा खेडकरांना नोटीस;१० दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास कारवाई

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा यांच्याविरुद्ध पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशीम येथे नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडकर यांच्यावर २६ हजार रुपयांचा थकीत दंड असल्याचे समोर आले. खेडकर यांनी खासगी मोटारीवर लाल दिवा लावल्याचे उघडकीस आल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.

दरम्यान, मनोरमा खेडकर यांनी धडवली (ता. मुळशी) येथील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या प्रकरणी मनोरमा, त्यांचे पती दिलीप खेडकर यांच्यासह सातजणांविरुद्ध पुणे ग्रामीणच्या पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘तुमचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. या कृत्यामुळे कुटुंबीय आणि समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. शस्त्र परवान्यातील अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचे दिसून आलेे. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात का येऊ नये? याबाबत दहा दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, असे नोटिशीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT