Karnataka Esakal
महाराष्ट्र बातम्या

कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू; महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होणार का?

सीमावादावरील तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली

सकाळ डिजिटल टीम

आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावातील बव्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काल रात्री या मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सकाळी ही परवानगी नकरची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरील तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली. यायच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला कर्नाटक सरकारकडून पाठ दाखवण्यात आली आहे.

तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करणीय आलेल्या मेळाव्यासाठी स्टेजच्या उभारणीचे काम थांबवने त्यानंतर स्टेजही हटवण्यात आला आहे. काल या मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आता अचानक काम थांबवण्यात आलं आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला महामेळावा रोखण्यासाठी मेळावा होणाऱ्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दबावतंत्र सूरू झाल्याचे दिसून येत आहे.

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती समिती तर्फे महामंडळाच्या आयोजन करण्यात आले होते. मंडप उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते मात्र पोलिसांनी सकाळी अचानकपणे मेळाव्याच्या ठिकाणी 144 कलम लागू आहे अशी माहिती देत या परिसरात कार्यक्रत्याना येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT