Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र

Arvind Sawant: रात्रीस खेळ चाले! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रात्रींच्या बैठकीवर सावंतांची टीका

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप यांचं सत्र सुरू असतानाच खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री हे सौजन्याची मूर्ती नाही, तर सुडाची मूर्ती आहेत, अशा तिखट शब्दांत अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची रात्री उशिरा बैठक झाली त्यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

बोलताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांना रात्रीचे कटकारस्थान करण्याची सवय आहे. आतापर्यंत जे कट कारस्थान रचली ती रात्रीच्या अंधारात रचली आणि वेशांतर करुनच केली असा टोला अरविंद सावंत यांनी फडणवीस यांना लगावला आहे. या शिवाय माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होतं, असं स्पष्ट म्हटलं होतं, याचीही आठवणही सावंत यांनी यावेळी करुन दिली आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना फडणवीस म्हणाले होते मला बदला घ्यायचा होता मी घेतला याचा दाखला यावेळी सावंत यांनी दिला आहे.

काल रात्री ठाण्यात झालेल्या राड्यावर बोलताना सावंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे यांना झोंबलं आहे, म्हणून ही प्रतिक्रिया आली आहे. या प्रतिक्रियेतूनच हात चालवला असल्याचा आरोपही अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर केला आहे. दरम्यान, या राड्यात स्थानिक लोकं नाहीत, त्यात बाहेरुन आलेली लोकं होती, असाही आरोप अरविंद सावंत यांनी यावेळी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT